Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

शहरात वाढला DJ चा कर्कश आवाज… कारवाई करणारे सुस्त ?….

रस्त्यावर वाजणारे साउंड व DJ वर… होणार का कारवाई ?… ध्वनी प्रदूषणापासून वणीकरांची होणार का सुटका…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शहरात प्रशासन काय करत आहे. हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यापासून मोठ्या जोमात विवाह सोहळा होत आहे. मात्र रस्त्यात मोठ मोठे ध्वनी प्रदुषण करणारे कर्णकर्कश बँड वराती मध्ये वाजतात. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तसेच शहरातील नागरिकांना रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागतात. या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना खूप त्रास होत आहे. मात्र पोलिस कोणतीच कारवाई करतांना दिसत नाही.

नियमानुसार 72 डेसिबलच्या वर ध्वनी वाजविता येत नाही व रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण करता येत नाही, तरीही शहरात सर्रासपणे नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी एका प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्रात सुद्धा कर्णकर्कश वाजणाऱ्या DJ व बँड बाबत बातमी प्रसिद्ध झाली होती, मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे शहरात नियम आहे की नाही असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे. वणी शहरात वाढणाऱ्या या प्रदूषणावर व रस्त्यावर वाजणाऱ्या वरातीतील मोठ मोठ्या बँड, साउंड वाजविण्यावर व DJ वाजविणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular