Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

शहरात चोरीचे सत्र सुरु… पोलिसांना चोर सापडतील का?

CCtv मध्ये चोरटे कैद…..

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

मागील अनेक दिवसापासून वणी शहरांमध्ये व परिसरात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या आहे. अनेक घरे फोडले व लाखोचा ऐवज नेला आहे. वारंवार शहरात चोऱ्या वाढत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालें आहे. अशीच घटना लग्न झालेल्या घरी नुकतीच घडली आहे.

ब्राह्मनी फाट्या जवळ जन्नत सेलिब्रेशन समोर विक्की करसे यांच्या घरी लहान भावाचे लग्न झालें व सर्व जण त्रेबकेश्वर ला फिरायला गेले. घरी कोणी नसलत्याने चोरांनी 19 जून ला घर फोडून चोरी केली. 15000 रोख व लहान मुलाचे गळ्यातले सोन्याचे लॉकेट चोरून नेले आणि घर अस्तव्यस्त करून गेले. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला व cctv मध्ये चोर पहाटे 3.15 वाजता घरात घुसताना दिसत आहे. मात्र अजूनही पोलिसांना चोर सापडले नाही. तसेच शहरात चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे पोलिसांना हे चोर सापडतील का? हा प्रश्न निर्माण होतो आहे ?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular