प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरातील प्रसिद्ध विधीतज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या वणी शहर अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून पक्ष बांधणीसाठी अतिशय उत्तम व समाजात कार्य करणारे निलेश चौधरी असल्याने तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे पक्षाचा गड अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली, याकरिता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे निलेश चौधरी यांनी आभार मानले. भाजपचे विचार, कार्यशैली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण मन लावून काम करेल आणि पक्षाने दाखवलेला जो विश्वास आहे त्याला मी सार्थ ठरविणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान, भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे,माजी जिल्हा सरचिटणीस रविजी बेलूरकर, मंडळ अध्यक्ष,भाजपा पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




