होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीत….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वसंती जीनिंग हॉल येथे भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा संकल्प ते सिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांच्या वणी शहरात प्रथम आगमन निमित्त यांचे मोठ्या उत्साहात सत्कार व स्वागत केले आणि नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचे सत्कार केले.यावेळी मोदी सरकार चे अकरा वर्ष, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती, आणी बाणी/आपत्काल चे ५० वे वर्ष, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आढावा बैठक पार पडली.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान, भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे,माजी जिल्हा सरचिटणीस रविजी बेलूरकर, मंडळ अध्यक्ष,भाजपा पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

मागेल त्याला घरकुल, विशेष म्हणजे अतिक्रमण धारकांनाही घरकुल, विज, रस्ते, जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ, लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबविल्या, आम्ही जो शब्द दिला तो पाळला त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता मिळवू असे नवनिर्वाचित भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांनी सांगितले.




