Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

जनतेची सेवा करा मी तुमच्या पाठीशी… भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रफुल्ल चव्हाण…

वणीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..  

जिल्हाध्यक्षच्यां सत्काराला भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अनुपस्थिती ?

 प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

तुम्ही अशीच  जनतेची सेवा करा,  मी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे . तुम्हाला काहीही अडचण जाणार नाही असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांनी केले. ते वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालय येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे अमोल ढोणे, संघटन सरचिटणीस राजू पडगीलवार, माजी जि. प. सदस्य बंडू चांदेकर,  ॲड. कुणाल चोरडिया , पवन एकरे, माजी नगरसेविका संध्या अवताडे , प्रीती बिडकर , स्वाती खरवडे,  महाकुलकर,  राहुल मुंजेकर यासह मान्यवर उपस्थित होते.  

  या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲड. कुणाल चोरडिया  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही विद्यार्थ्यांना माझी गरज पडल्यास मी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी , जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तर यवतमाळ जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षेमध्ये पास होणे आणि गुणवत्ता यादीत येण  हा तेवढाच फरक आहे , जेवढ  मोठ अंतर शिक्षित बेरोजगार आणि सुशिक्षित बेरोजगार या दोन शब्दांमध्ये आहे. सुशिक्षित हा बेरोजगार नसतो शिक्षित हा बेरोजगार असतो. या दोन शब्दांमध्ये अंतर समजून घेतले तरी आपण उज्वल भविष्य घडवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले .

भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी ज्या विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठून भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे . अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांचेही अभिनंदन केले तर गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे दाखले देत विद्यार्थ्यांना प्रगती करायची असेल तर सोशल मीडिया आणि मोबाईल पासून दूर राहावे जर मोबाईलचा योग्य वापर झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे तेच क्षेत्र शिक्षणासाठी निवडावे यासाठी समोरचा दृष्टिकोन लक्षात घ्यावा अपयशाला खचून जाऊ नये असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिलीप अलोणे  तर आभार  सागर जाधव यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रफुल्ल चव्हाण यांचा सत्काराला अनेकांची अनुपस्थिती ?

 भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रफुल्ल चव्हाण यांचा भाजप तर्फे सत्कार करण्यात आला, मात्र तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी, नेहमी कार्यक्रमात असणारे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांना भाजप मध्ये उघडपणे गटबाजी दिसत होती.  जिल्हाध्यक्षाच्या सत्कार कार्यक्रमात अंतर्गत वाद व गटबाजी चव्हाट्यावर आल्याने येणाऱ्या निवडणुकीत दुसरा पक्ष बाजी मारणार यात शंका नाही, अशी जोरदार चर्चा नागरिकांन मध्ये सुरु होती.  

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular