Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

अ.भा.वि.प. वणीच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिवस व स्थापना दिन उत्साहात साजरा…

यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा – वणी नगर यांच्या वतीने अभाविपचा स्थापना दिवस व राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून “यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर कार्यक्रम” उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते गजानन कासावार (सिनेट सदस्य, अमरावती विद्यापीठ), प्रमुख उपस्थिती संजय पिंपळशेंडे ( माजी सभापती, वणी) व अनिकेत दांदडे (विदर्भ प्रांत सहमंत्री, अभाविप) यांची उपस्थिती होती.

यावेळी वणी नगरातील विविध शैक्षणिक संस्थांतील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अ.भा.वि.प. वणी नगराच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये वैभव दहेकर यांची नगर अध्यक्ष, तर आयुषी फुलेवार यांची नगर मंत्री म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, समाजबद्धता आणि नेतृत्व गुण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अ.भा.वि.प.ची ही परंपरा सातत्याने चालू आहे.

या कार्यक्रमाला यवतमाळ विभाग संयोजक नीरज चौधरी, वणी जिल्हा संयोजक चेतन राऊत, जिल्हा संघटनमंत्री वैभव वाघमारे, माजी नगरमंत्री विनय पुराणकर, इतर कार्यकर्ते व पालक उपस्थित होते.

 
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular