गोरगरीब विद्यार्थ्यांचे पालक हरवले… अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा…
AM न्यूज 24 वृत्तांकन, वणी
विद्यार्थी घडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो, कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी पडू देत नाही व विद्यार्थी घडविणे हे माझं कर्तव्य आहे आणि विद्यार्थी आहे म्हणूनचं माझं अस्तित्व आहे असे म्हणणारे नगर परिषद शाळा क्र. 8 चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिलीप कोरपेनवार (वय 57 वर्ष) राहणार रविनगर, रविवार दिनांक 20 जुलै ला वरोरा चिमूर मार्गावर रान तळोदी शिवरात पहाटे 4.30 वाजताच्या दरम्यान चिमूर येथे कामासाठी मालवाहू पिकअप MH 49 D 4431 या वाहनाने जात होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणारा टँकर MH 34 BJ6445 ने जोरदार धडक दिली. यात दिलीप कोरपेनवार यांना डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भर्ती केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाहन चालक व सहकारी हे जखमी झालें असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.





