मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिनानिमीत्य “सेवा ते संघटन” अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, वणी तालुक्याचे वतीने दिनांक २२ जुलै रोजी मंगळवारला वसंत जिनिंग हॉल वणी येथे सकाळी ९:०० ते दुपारी ३ः०० वाजेपर्यंत भव्य महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी तालुक्यातील सर्व जनतेनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तदान हे जीवनदान असून, अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ते आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनतापार्टी वणी विधानसभेच्या वतिने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. नागरिकांनी आपला वेळ देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





