शिरपूर येथे जाणाऱ्या कावड यात्रेतील भक्तांसाठी….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी 9921031427

श्री काशी शिवमहापूरान समिती तर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 6 ऑगस्ट ला सकाळी 8 वाजता जैताई माता मंदिरातून हि कावड यात्रा निघणार आहे. हि कावड यात्रा शिरपूर येथे जाणार असून सर्व भक्तांसाठी मंदर जवळील चोरडिया फार्म हाऊस येथील राधा कृष्ण मंदिरात ऍड. कुणाल चोरडिया यांच्या कडून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कावड यात्रेत विविध देखावे असणार आहे तसेच प्रत्येक ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. या कावड यात्रेत मोठ्या प्रमाणात भक्त सहभागी होणार आहे. तसेच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी लहानान पासून तर मोठ्यानं पर्यंत सर्वानी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





