Monday, September 7, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणीत ऑनलाईन वरली मटका अड्ड्यावर छापा

तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक, फ्लॅट मालकावरही गुन्हा दाखल

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी 9921031427

वणी पोलिसांनी पद्मावती नगरी येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन वरली मटका अड्ड्यावर छापा मारून तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फ्लॅट मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पथकासह पद्मावती नगरीतील एका फ्लॅटवर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय ६०, रा. वारंगल, तेलंगणा), राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय ५२, रा. पेगडामपल्ली, तेलंगणा), फरदिन अतिक अहेमद (वय २४, रा. सबा कॉलनी, वणी) आणि स्वामी कोमराया बोक्का (वय ३६, रा. म्युचाराला, तेलंगणा) यांना अटक केली. हे आरोपी मोबाईलद्वारे ऑनलाईन वरली मटका नावाचा जुगार खेळवत होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अँड्रॉइड मोबाईल (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), दोन जुने मोबाईल (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), दोन टॅब (अंदाजे किंमत २० हजार रुपये), एक प्रिंटर (अंदाजे किंमत २० हजार रुपये), दोन कॅल्क्युलेटर (अंदाजे किंमत ५०० रुपये), एक लॅपटॉप (अंदाजे किंमत २५ हजार रुपये), वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि ९ हजार २०० रुपये रोख असा एकूण १ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात समोर आले की, हा फ्लॅट मनीष सुरावार (रा. वणी) यांच्या मालकीचा असून त्यांनी तो आरोपींना १० हजार रुपये प्रति महिना भाड्याने दिला होता. सुरावार यांनी अवैध जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार PSI धीरज गुल्हाने, PSI अंकुश वडतकर, पोकॉ मिथुन राऊत, पोकॉ मानेश्वर खंडरे, पोकॉ गजानन कुडमेथे, पोकॉ नंदकुमार पुप्पुलवार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular