Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

मला न्याय मिळेल का ? टिळकांच्या वेशात शासनाला प्रश्न?

टिळकांच्या पुतळ्याला न्याय द्या : वणीकरांची मागणी

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी 9921031427

शहरातील मुख्य चौकाला टिळक चौक म्हणून ओळख असणाऱ्या चौकात लोकमान्य टिळक यांचा पुतळा जुन्या जागेवरच बसवण्यात यावा अशी मागणी वणीकरांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जयंत त्रिवेदी यांनी मागणी केली आहे.  यावेळी निवेदनकर्ते  त्रिवेदी यांनी टिळकांच्या वेशभूशेत निवेदन दिल्याने प्रशासनाचे लक्ष नक्कीच वेधले.

लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन जयंत त्रिवेदी यांनी टिळकांच्या वेशभूशेत तहसील कार्यालयात पायी जाऊन तहसीलदार यांना निवेदन देत आग्रही मागणी केली. 

 वणी येथील टिळक चौक येथे पूर्वापार असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा रस्त्याच्या कामाकरिता बाजूला करण्यात आलेला होता, परंतु तो पुतळा आजतागायत परत तिथे बसविण्यात आलेला नाही आणि पुतळ्याला एका कोपऱ्यात बसविण्यात आला व त्या पुतळ्याला अतिक्रमाणाचा विळखा निर्मन झाला आहे. अशी अवस्था पुतळ्याची झाली आहे. तसेच 23 जुलै ला जयंती असून सुद्धा नगर परिषदे काढून कोणतीच स्वच्छता करण्यात येत नाही. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची विटंबना थांबवून तो पुतळा जुन्या जागी स्थानापन्न करावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. 

पूर्वी असलेल्या टिळकांच्या पुतळ्यापासून वणी नगर परिषदला कोणती अडचण झाली होती हा प्रश्न जनतेला पडला होता. कारण आता त्या ठिकाणी दोन हात व त्यात एक बाळ असलेले प्रतिकृती तेथे उभी आहे. तर टिळकांच्या पुतळ्याला बाजूला ठेवण्याचे कारण नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेला अद्यावत सापडलेले नाही. मात्र नव्याने जुन्याच जागेवर टिळकांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयंत त्रिवेदी यांनी टिळकांची वेशभूषा घेऊन पायी जाताना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे  लक्ष वेधून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular