टिळकांची वेशभूषा करून पुतळ्या साठी मागणी…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी 9921031427

शहरातील मुख्य चौकाला टिळक चौक म्हणून ओळख असणाऱ्या चौकात लोकमान्य टिळक यांचा पुतळा जुन्या जागेवरच बसवण्यात यावा अशी मागणी वणीकरांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जयंत त्रिवेदी यांनी मागणी केली आहे. निवेदनकर्ते जयंत त्रिवेदी यांनी टिळकांच्या वेशभूशेत प्रशासनाचे लक्ष वेधले.

वणी येथील टिळक चौक येथे पूर्वापार असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा रस्त्याच्या कामाकरिता बाजूला करण्यात आलेला होता, परंतु तो पुतळा आजतागायत परत तिथे बसविण्यात आलेला नाही आणि पुतळ्याला एका कोपऱ्यात बसविण्यात आला व त्या पुतळ्याला अतिक्रमाणाचा विळखा निर्माण झाला आहे. अशी अवस्था पुतळ्याची झाली आहे. तसेच 23 जुलै ला जयंती असून सुद्धा नगर परिषदे कडून कोणतीच स्वच्छता करण्यात येत नाही. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची अवहेलना थांबवून तो पुतळा जुन्या जागी स्थानापन्न करावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

पूर्वी असलेल्या टिळकांच्या पुतळ्यापासून वणी नगर परिषदेला कोणती अडचण झाली होती हा प्रश्न जनतेला पडला होता. कारण आता त्या ठिकाणी दोन हात व त्यात एक बाळ असलेले प्रतिकृती तेथे उभी आहे. तर टिळकांच्या पुतळ्याला बाजूला ठेवण्याचे कारण नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेला अद्यावत सापडलेले नाही. त्यामुळे आता तरी टिळकांच्या पुतळ्याला न्याय मिळेल का? अशी चर्चा नागरिक करत आहे.





