Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

सहजयोगामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक आमूलाग्र बदल : सरिता दातीर यांचे प्रतिपादन

सहजयोगाद्वारे यशस्वी जीवन कसे जगायचे याचा मंत्र दिला

AM न्यूज 24 वृतांकन, वणी


प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक व सामाजिक जीवन असते. या फेऱ्यातून जाताना प्रत्येकाला संतुलनात राहणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पावलावर निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी सहजयोगाच्या माध्यमातून ध्यान धारणा करून वैयक्तिक विकास साधल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून असा विश्वास डॉ. सरिता दातीर यांनी व्यक्त केला.


त्या येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात अमरावती विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक 24 सप्टेंबर ला कार्यशाळा घेण्यात आली. त्या प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रसाद खानझोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक नीलिमा दवणे, विद्यार्थी विकास विभागाचे आयोजक डॉ. प्रा. अभिजीत अणे हे उपस्थित होते.


या प्रसंगी डॉ. दातीर बोलतांना म्हणाल्या की, सहजयोगाच्या प्रणेत्या प. पू. निर्मला मातेने सहजयोगाद्वारे यशस्वी जीवन कसे जगायचे याचा मंत्र दिला. आपल्या शरीरातील मुलाधार चक्र , स्वाधिष्टान चक्र, नाभीचक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र व सहस्त्रार चक्र ध्यानाद्वारे कसे स्वच्छ ठेवायचे हे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांची कुंडलिनी शक्ती जागृत करून दिली.
त्यानंतर उपस्थित अतिथिनी समयोचित प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास जुनगरी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अभिजीत अणे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular