Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ब्राह्मण समाजाकडून स्व. राजाभाऊ पाथरडकर यांना श्रद्धांजली…

दिनांक 08 ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता वसंत जीनिंग हॉल वणी येथील हॉल मध्ये बहुभाषिक ब्राह्मण सभा वणी कडून अध्यक्ष स्व. राजाभाऊ पाथरडकर यांच्या निधनानंतर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ब्राह्मण सभा, पाराशर ब्राह्मण सभा, त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण सभा व राजस्थानी मारवाडी ब्राह्मण सभा यांच्या व बहुभाषिक ब्राह्मण सभा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने सभा घेण्यात आली. यावेळी केंद्रीय सचिव किशोर पाठक, जिल्हा अध्यक्ष संजीव जोशी, राज्य युवा आघाडी सरचिटणीस राम साकळे , युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष परीक्षीत शर्मा, मिश्रा, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, मनु महाराज तुगनायत , सुरेश देशकर, चंद्रशेखर खोंड, लक्ष्मीनारायण पांडे, प्रमोद देशमुख यांनी यावेळी शोक संवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन ॲड प्रविण पाठक, प्रास्ताविक अमित उपाध्ये, शांती मंत्र पठण मयुरजी जोशी यांनी केले. यावेळी ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची यावेळी उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular