येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची चमू 17 वर्षा खालील विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी झाली. दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी यवतमाळ येथे अंडर 17 व्हॉलीबॉल मुलींचा संघ विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले ,त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या संघात प्रणाली कामटकर, भाग्यश्री कामटकर, आरुषी मोगरे, माधवी आसुटकर, धानी मजगवळी, बसरत जहा अहमद, जानवी तरासे, साक्षी शेंडे , श्रावणी , मयुरी मानकर, विद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका सिंग तसेच मालगडे व संस्कार क्लबचे कोच पिंपळकर यांचे नियमित मार्गदर्शन व परिश्रम पूर्वक सराव यामुळे हे यश मिळाले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के मंडळाचे व्यवस्थापन समिती आणि सर्व संचालक तसेच प्राचार्य प्रमोद शिरसागर यांनी व्हॉलीबॉल चमू चे अभिनंदन व कौतुक केले.




