Thursday, May 28, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणी मध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी : AM न्युज वृत्तांकन, वणी

बहुगुणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वणी शहरांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या यजमानत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आंतर महाविद्यालयीन स्तरावरील मुलांची शरीर सौष्ठव स्पर्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने संपन्न झाली.

प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी स्वतःच्या आरोग्य संपन्नतेतून इतरांना सेवा प्रदान करण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आणि सुयोग्य कार्यासाठी आपले शरीर हेच महत्त्वपूर्ण साधन आहे ही भूमिका मनी ठसावी यासाठी हे आयोजन असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी विदर्भाचे पुणे असणाऱ्या वणीच्या विविध विषयातील योगदानाचे वर्णन करीत, वणी नगरामध्ये अशा स्वरूपात प्रथमच होत असलेल्या विद्यापीठीय स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.
अमरावती विद्यापीठाच्या ५ ही जिल्ह्यांमधून विविध ६ गटांमध्ये एकूण २२ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. प्रा. विराट घुडे, डॉ.अनुज केला, अविनाश लोखंडे या मान्यवरांनी परीक्षणाचे कार्य केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक गटातील प्रथम तीन स्पर्धकांना पदकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यापीठाद्वारे निवड झालेले स्पर्धक पुढे अखिल भारतीय स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संचालक प्रा. उमेश व्यास यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी केले. स्पर्धेच्या सादरीकरणाचे सूत्रसंचालन अविनाश लोखंडे यांनी केले. वणीकर जनतेचा आणि प्राधान्याने तरुणाईचा मिळालेला प्रतिसाद आयोजनाचे वैशिष्ट्य होय.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular