AM न्युज वृत्तांकन, वणी
उच्च न्यायालयाचा आदेशाला वणी शहरात व परिसरात काहीच किंमत नाही. वणी पोलिसांचा शहरात व परिसरात वचक राहिला नाही, यात काही शंका नाही. रात्रीचे 10 नंतर सुद्धा मोठ्या आवाजात dj सुरु असतो चिखलगाव, गणेशपूर, वागदरा, लालगुडा परिसरात नेहमी सुरु असतो मात्र dj वाजवीणाऱ्याचे कोणीच वाकडे करत नाही, हे त्याला माहित आहे. जिल्हा परिषद कॉलनी परिसरातुन रात्रीचे 11.15 वाजून गेले तरीही dj सुरु होता. त्याच्यावर कोणीच कशी कारवाई करत नाही. 112 वर call करून सुद्धा पोलीस कारवाई करत नाही हे मात्र खरं आहे. पोलीस पोहचली तर त्याला सूचना देऊन सोडून देतात. खर तर त्याचा dj जप्त करून कारवाई करायला पाहिजे. पण पोलीस प्रशासन तस करत नाही.
नियम सांगतो 72 डेसिबल ध्वनी असायला पाहिजे मात्र दिवसा तर त्यापेक्षा मोठा असतो आणि रात्री तर मोठाच आवाज असतो. वणी पोलीस आपली खाकी ची ताकद सर्व सामान्य जनतेवर दाखवण्यातच स्वतःला धन्य मानतात की काय हा प्रश्न वणीकर जनतेला पडला आहे. सर्व सामान्य जनतेने तक्रार करून सुद्धा dj चा आवाज कमी का होत नाही. हा प्रश्न उपस्थित होतो.
वणी पोलीस ठाण्यात नागरिकांने फोन केला असता महिला पोलीस कर्मचारी म्हणतात की 11 वाजेपर्यंत dj साऊंड वाजविण्यास परवानगी आहे. मग उच्च न्यायालयाचा आदेश 10 पर्यंत कोणासाठी आहे. हा प्रश्न उपस्थित झाला आहे?रात्रीचे 11 वाजूनही dj साऊंड सुरूच आहे. हि फार मोठी शोकांतिका आहे. पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना पत्ता सांगून सुद्धा पोलीस पोहचू शकत नाही. याला काय म्हणावे. Dj वाल्याना पोलिसांनाचा आशीर्वाद आहे का? की कुठे पाणी मुरत आहे. हे जनतेला चांगलंच माहित आहे.




