Thursday, May 28, 2026
Google search engine
spot_imgspot_img

रा.से.यो.ने साजरा केला विविध उपक्रमासह एड्स जनजागृती सप्ताह…

AM न्युज वृत्तांकन, वणी

एड्स जनजागृती सप्ताहात व्याख्यान , एड्स जनजागृती पर रँली, पथनाट्य, आरोग्य तपासणी,पोस्टर स्पर्धा , प्रश्नमजुषा , तसेच रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य टिळक महाविद्यालय रा.से.यो.विभाग आणि रेड रिबन क्लब द्वारा एड्स जनजागृती सप्ताह विविध उपक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्ठ रित्या संपन्न झाला.

दि.-3/12/2025 रोजी मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तसेच कार्यक्रम अधिकारी तथा यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ.निलीमा दवणे आणि डॉ .विकास जूनगरी यांच्या नेतृत्वात एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले . यात एड्स बाबत रँलीच्या माध्यमातून एड्स मुक्त समाज हा संदेश जनसामान्यापर्यत पोहचविण्यात आला . वणी शहरामध्ये विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एड्स जनजागृती करण्यात आली. एड्स मुक्त युवा हा विषय घेवून पोस्टर स्पर्धा घेण्यात आली ,मुलींनी रांगोळी स्पर्धेतून एड्स अभियान साकारले . 10/12/2025 ला आय सी टी समुपदेशक ग्रामीण रुग्णालय वनी च्या संगीता वैद्य यांनी एड्स जनजागृती पर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

याप्रसंगी प्रास्ताविक करत असताना डॉ. नीलिमा दवणे यांनी देशाचा जागृत नागरिक म्हणून या महाभयंकर रोगापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वतःची काळजी आणि समाजाची काळजी राष्ट्रीय स्वयंसेविकांनी घ्यावी असे आवाहन केले . प्रकाश वैद्य यांनी एड्स मुक्त भारत याविषयी विद्यार्थ्यांना शपथ दिली आणि ग्रामीण रुग्णालय वणी येथील चमू यांनी विद्यार्थ्यानची आरोग्य तपासणी केली यामध्ये CBC, SOLUBILITY , HIV, VDRL एड्स चाचणी, या सर्व चाचण्या करण्यात आल्या यासाठी संगीता वैद्य प्रकाश काळे आयसीटी समुपदेशक ग्रामीण रुग्णालय वणी अंकुश बानगुडे आर के एस के समुपदेशक ग्रामीण रुग्णालय वणी तसेच शितल राजगडकर आणि धनश्री हनुमंते फ्लोबो टॉमी ग्रामीण रुग्णालय वणी या चमु ने एड्स जनजागृती पर आरोग्य तपासणीला मोलाचे सहकार्य केले.

व्याख्यानाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन रेड रिबन क्लबची विद्यार्थिनी सृष्टी थाटे हिने सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन नीलिमा काथवटे हिने केले तर आरोग्य तपासणी मध्ये समृद्धी टिप्रमवार , संकेत उमरे, सुदर्शन राऊत, कार्तिक राऊत, अंकित भालेराव, रुद्र किनाके, आचल बोथकर, विशाल बोंडे , संजय बिलोरिया यांनी सहकार्य केले एड्स आणि जागृती पंधरवाडा या उपक्रमामध्ये रेड रिबन क्लब तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular