Thursday, May 28, 2026
Google search engine
spot_imgspot_img

झरी येथे शिवसेनाचा झेंडा फडकला….

नगर परिषद निवडणूक निकालाच्या पहिले शिंदे सेनेचा नगराध्यक्ष यांची अविरोध निवड…

AM न्युज वृत्तांकन, वणी

नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालपूर्वी वणी विधानसभा क्षेत्रात झरी नगर पंचायत मध्ये शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला असून शिला चौधरी या नगरध्यक्ष पदावर अविरोध निवड झाली. विजय चोरडिया यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्या पासून वणी विधानसभा क्षेत्रात सर्व कार्यकर्त्यांन मध्ये नवचैत्यानं निर्माण झाले आहे. 15 डिसेंबर ला अविरोध निवड झाल्याने विजय चोरडिया यांचे दमदार नेतृत्व असल्याचे सिद्ध झाले आहे. यात विशेष योगदान शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, भाजपचे दिनेश जयस्वाल यांच्या अथक परिश्रमाणे झरी येथे शिंदेसेनेचा झेंडा फडकला.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहितकर जिल्हा सह संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल,मनीष सुरावार, राहुल मुंजेकर, निलेश होले, पायल तोडसाम, सोनाली पुरी, कपिल कुंटलवार, आशिष गुप्ता, बाळू चेडे, शम्म सिद्धीकी, प्रणोती बांगडे, यासह मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना जिल्हा संघटक पदावर आल्यावर विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात पहिला नगराध्यक्ष विराजमान झाल्याने वणी विधान सभा क्षेत्रातील कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात इतर पक्षाचे पदाधिकारी विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular