
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
शहरालगतच्या चिखलगाव येथे श्री संत विदेही शंकरबाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत विदेही शंकरबाबा देवस्थान समिती व समस्त ग्रामवासी यांच्या वतीने गुरुवार, २९ ऑक्टोबर ते मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शिव महापुराण कथा व महाप्रसाद सोहळा पार पडणार आहे.
महोत्सवाची सुरुवात गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना व अभिषेकाने होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शिव महापुराण कथेला प्रारंभ होणार आहे. ह.भ.प. वृंदा पुणेकर यांच्या रसाळ वाणीतून ही कथा सादर केली जाणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत दररोज भजन, कीर्तन, शिव महापुराण कथा आणि सामूहिक प्रार्थना असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाची सांगता होईल. यावेळी विविध धार्मिक विधी, काल्याचे कीर्तन, दहीहंडी, बक्षिस वितरण, मान्यवरांचा सत्कार आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक महोत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिव महापुराण कथेचे श्रवण करावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत विदेही शंकरबाबा देवस्थान समिती व समस्त ग्रामवासी चिखलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.





