Wednesday, October 28, 2026
Google search engine
spot_imgspot_img

नृत्याने मन जिंकणारा कलावंत…

प्प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्यकलाकार विकास घाटोळे हे महाराष्ट्रातील लावणी, शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे नृत्यकलाकार, नृत्यदिग्दर्शक व कार्यक्रम आयोजक आहेत. पुणे येथे त्यांना ‘महाराष्ट्राचा लावणी सम्राट’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
भरतनाट्यम विशारद ही पदवी प्राप्त केलेले घाटोळे कथ्थक विशारदच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर विविध राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसह अनेक सन्मान मिळवले आहेत. गुरू गोतना पुरस्कार, लावणी गौरव पुरस्कार, सावित्री-जिजाऊ महोत्सवातील विशेष सन्मान तसेच ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (आठल्ये) यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार त्यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.


चित्रपट क्षेत्रात त्यांनी सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले असून, ‘बूगी-वूगी’ (सोनी टीव्ही), ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि स्टार भारतवरील नृत्य सादरीकरण अशा दूरचित्रवाणी कार्यक्रमांतही सहभाग घेतला आहे.
नृत्य क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी सुमारे १,५०० कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असून, १,२०० नृत्य स्पर्धांशी संबंधित अनुभव मिळवला आहे. २००९ ते २०१५ या काळात विकास डान्स अकॅडमीच्या माध्यमातून नृत्य स्पर्धांचे आयोजन केले. तसेच २०२२ आणि २०२३ मध्ये भालार, वणी येथे गरबा स्पर्धांचे आयोजन करून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
लावणी, कथ्थक, भरतनाट्यम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नृत्यकलेचा प्रसार करणे, ही त्यांच्या कलाप्रवासाची प्रमुख ओळख आहे.

पुरस्कार व उल्लेखनीय कामगिरी
१. गुरू गोतना पुरस्कार – सप्तारंग सांस्कृतिक महोत्सव, नांदेड, २०१८.
२. सिटी केबल, वरोरा – २००१, तृतीय पारितोषिक.
३. किरण केबल नेटवर्क, विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा, गडचिरोली – प्रथम पारितोषिक.
४. नृत्यनृत्यती, भारतीय शास्त्रीय नृत्य महोत्सव, भिलाई, २०१८ – सन्मान पुरस्कार.
५. राज्यस्तरीय स्पर्धा, दिघ्रज, २००८ – द्वितीय पारितोषिक.
६. प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल, २००६ – सन्मान पुरस्कार.
७. लोकमत व्यासपीठ, राजुरा – प्रथम पारितोषिक.
८. सावित्री-जिजाऊ महोत्सव, २०१७ – विशेष सन्मान पुरस्कार.
९. भारतीय जनता पक्षाचा अमृत महोत्सव – सन्मान पुरस्कार.
१०. मराठा सेवा संघ – सन्मान पुरस्कार, २०१५.
११. नृत्यनृत्य कला क्षेत्र लावणी गौरव पुरस्कार, भिलाई, २०१८.
१२. विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा, वरोरा, २००६.
१३. सप्तारंग सांस्कृतिक महोत्सव, नांदेड, २०१८ – द्वितीय पारितोषिक.
१४. कात्यायनी कथक केंद्र, चंद्रपूर आयोजित विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा, २००३ – प्रथम पारितोषिक.
१५. खिल लोककला सांस्कृतिक संस्था, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – २०१७, सचिव पुरस्कार.
१६. श्री दादाजी धुनीवाला देवस्थान ट्रस्ट, वर्धा – सांस्कृतिक कार्यक्रम, २०१३, प्रथम पारितोषिक.
१७. विदर्भस्तरीय महिला विशेष नृत्य स्पर्धा, चंद्रपूर, २०१८ – सन्मान पुरस्कार.
१८. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा, वरोरा, २००६ – एकल नृत्य, प्रथम पारितोषिक.
१९. सावित्री-जिजाऊ आणि छत्रपती महोत्सव, वणी, २०१९ – विशेष सन्मान.
२०. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती राज्यस्तरीय स्पर्धा, मारेगाव, २०१५ – महाराष्ट्राची लावणी गौरवचिन्ह.
२१. ग्लोबल हार्मनी भावरंगताल, २०१६ – सांस्कृतिक संघ ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर, पुणे यांच्याकडून सन्मानचिन्ह व विशेष पुरस्कार.
२२. नटराज सांस्कृतिक कला केंद्र, चंद्रपूर – राज्यस्तरीय स्पर्धा, २००८, तृतीय पारितोषिक.
२३. चॅनल टुडे, वरोरा – बूगी-वूगी मेगा पॉवर टीम, २००८, एकल नृत्याचे द्वितीय पारितोषिक.
२४. यवतमाळ अर्बन बँक, वणी – १५ ऑगस्ट २०११, द्वितीय पारितोषिक.
२५. ग्रामविकास प्रतिष्ठान महोत्सव, २०११ – नृत्य स्पर्धेत तृतीय पारितोषिक.
२६. नाच दे चिल्ड्रन नृत्य स्पर्धा, २००८ – प्रथम पारितोषिक.
२७. विविध रंगारंग कार्यक्रमांतील कलाक्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल गौरवचिन्ह.
२८. अलका कुबल (आठल्ये) हस्ते पुरस्कार.
चित्रपट क्षेत्रातील अनुभव
सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम
१. आधार चित्रपट.
२. दुर्गा मंट्यात मला.
३. अभिनेत्री दीपाली सय्यद, मिलिंद गवळी आणि प्रज्ञा जाधव यांच्याशी संबंधित चित्रपटांमध्ये सहाय्यक नृत्यदिग्दर्शनाचे काम.
४. दीपाली सय्यद यांच्या राया मला, इश्काचा गुलकंद खिलवा या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शनाशी संबंधित काम.

संपर्क : ९८२२९३०७३४
विकास घाटोळे
शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्यकलाकार | नृत्यदिग्दर्शक |

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular