
साई मंदिर चौक ते रेल्वे गेट पर्यंत खड्डेच खड्डे… याच रस्त्यावर अपघात झाला की दवाखाना जवळ असल्याने भर्ती होऊन उपचार घेता येतो म्हणून रस्ता दुरुस्त करत नसेल का ?
प्रतीनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरातील रहदारीचा रस्ता हा नांदेपेरा ला जाणारा असून साई मंदिर चौक ते नांदेपेरा रोड वर रेल्वे गेट पर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून अनेक खड्डे पडले आहे. लोकप्रतिनिधी यांनी हा रस्ता लवकरच बांधण्याचे सांगितले होते, मात्र अजूनही रस्त्याची साधी दुरुस्ती पण केली नाही.

दरवर्षी प्रमाणे यंदाही या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचले तसेच जगन्नाथ महाराज मंदिराजवळच्या समोर आपल्याला छायाचित्रात दिसणारे पाणी संपूर्ण रस्त्यात साचल्यामुळे येथे बऱ्याच दुचाकी सायकल वाल्यांचे अपघात घडले आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी पुढारी या रस्त्याकडे यांचे कायम दुर्लक्ष आपल्याला दिसत आहे. या खड्ड्यात पडून एखाद्या नागरिकाचा किंवा शाळेच्या मुला मुलींचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार की काय असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

या रस्त्यावर नेहमीच पावसाळ्यात पाणी साचून असते त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून बाजूलाच नगरपरिषद शाळा क्रमांक 5 व लायन्स इंग्लिश मीडियम शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांचे सुद्धा आरोग्य धोक्यात आहे. मात्र प्रशासन खूपच सुस्त आणि लोकप्रतिनिधी खूपच मस्त आहे. जनतेला फक्त खोटे आश्वासन देऊन विकास कामे केल्याचा प्रदर्शन करत आहे. या रस्त्याची नाममात्र दुरुस्ती करतात का हा प्रश्न जाणारे येणारे आणि या परिसरातील नागरिकांना पडला आहे.






