AM न्यूज वृत्तांकन, वणी
वणी शहरातील प्रसिद्ध ढाले फ्रेमिंग चे संचालक अनिल दादाजी ढाले वय 72 यांचे नागपूर येथे दिनांक 5 जुलै 2024 ला रात्री 11 वाजता उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.
वणी शहरातील डॉ.आंबेडकर चौकात त्यांचे ढाले फ्रेमिंग नावाचे दुकान आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुली, मुलगा , जावई, नातू असा आप्त परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर वणीतील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.




