Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान… सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट …..

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सुशगंगा पब्लिक स्कूल, पॉलिटे्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रदिप बोनगिरवार, विशेष अतिथी लो. टि . महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे तसेच प्रवीण दुबे प्राचार्य सुशगंगा पब्लिक स्कूल, पुष्पा राणी प्राचार्या सुशगंगा पॉलिटे्निक व अली यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी दहावीच्या वार्षिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केलेल्या कृष्णा बिजवे, हनिया खान,श्रावणी बोनगिरवार , तसनिम पठाण, अनुप ऐकरे, अदा पटेल तेसेच पॉलिटे्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूजा पांडे , प्रास्ताविक श्री. प्रवीण दुबे व आभार प्रदर्शन प्रियंका कानकुटला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular