दातृत्वाचे धनी विजय चोरडिया यांचे कौतुकास्पद कार्य…..

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन वणी यांच्या वतीने प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने दिनांक 14 एप्रिल ला सकाळी 10 वाजे पासून सुरुवात होणार आहे. या शिबिरात मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शास्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे शिबिर शिंदोला येथील रत्नकला मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असून रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी सेवाग्राम येथे पाठविण्यात येणार आहे. व त्यांना जाणे येणे, भोजन, राहणे यासाठी सर्व सुविधा विजय चोरडिया यांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.





