प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

सर्वत्र अतिशय आनंदात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणे व विद्यार्थ्याने शिक्षकांना गुरुदक्षिणा देणे अशी ही गुरु शिष्याची परंपरा अनेक युगांपासून सुरू आहे. आज आखाडी पौर्णिमा असून पहिल्या सणाला सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील सोमनाळा येथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन वृक्षा रोपण केले. संपूर्ण गावातून वारीची प्रतिकृती द्वारे साई बाबा च्या वेशभूषा करून भजन दिंडी, पालखी काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोमनालाळा मंडळाचे सचिव प्रमोद कालेकर यांचा वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्याला उत्कृष्ट करण्यासाठी राहुल कुत्तरमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या पालखी सोहळ्याला गावातील लहान मोठे स्त्री पुरुष सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मिरवणुकी नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





