वणी विधान सभा क्षेत्रा साठी भाजप मध्ये वाढणार उमेदवारी साठी चुरस…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

विधानसभा निवडणुकी साठी विजय चोरडियांचा उमेदवारी करिता दावा राहणार आहे. कारण गेल्या 35 वर्षापासून समाजकारणात असून वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारणात सहभाग आहे. माझे निस्वार्थी, अविरत सामाजिक कार्य व जन सामान्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची बाजू व समस्या सोडवण्याची क्षमता असल्यामुळे तसेच तळागाळातील तरुण-तरुणी महिला पुरुष वृद्ध प्रत्येक जाती-धर्माशी दांडगा संपर्क असल्यामुळे मी एक सक्षम उमेदवार म्हणून भाजपकडे पर्याय आहे. त्यामुळे पक्षाने माझ्या बाबत नक्कीच विचार केला पाहिजे आणि पक्ष नक्की करणार अशी मला आशा आहे.

सर्वसामान्यांच्या समस्या त्यांच्या भावना समजून, गरजूला कोणती खरी मदत हवी तेव्हा त्यांचे दुःख दूर करणे, खरी समाजसेवा समजून ईश्वराने आपल्याला समाजसेवा करण्याची संधी दिल्याने आपण कार्य पूर्ण करत आहोत असे सामाजिक कार्यकर्ते गरिबांच्या मनातले देवदूत म्हणून ओळख असलेले भाजपचे प्रदेश सदस्य हसतमुख आणि सदैव कार्यरत असणारे विजय चोरडिया 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

मागील वीस वर्षापासून राजकारण समाजकारण सांस्कृतिक कार्य धार्मिक क्षेत्र क्रीडाक्षेत्र व सर्वधर्मसमभाव लहान मोठा गरीब श्रीमंत अशा सर्व व्यक्तींसोबत त्यांचे कार्य उत्कृष्ट सुरू आहे. त्यामुळे पक्षाने मला यावेळेस निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून भाजपकडून संधी द्यावी याकरिता मी मागणी करत आहे अशी माहिती श्री विनायक हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी दिली आहे.

वणी,झरी, मारेगाव तिन्ही तालुक्यात विजय चोरडिया यांचे भरीव योगदान असून दांडगा जनसंपर्क आहे. त्यांनी अनेक आरोग्य शिबिर क्रीडा उत्सवाचे आयोजन केले आहे.
विजय चोरडिया यांची खरी सुरुवात कामगारांच्या आंदोलनापासून झाली आहे. त्यांचे कार्य फार मोठे असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान, मोठा जनसंपर्क, उत्कृष्ट शैली, उत्तम शिक्षण व अभ्यासू व्यक्ती असल्याने पक्षाने मला उमेदवारी द्यावी असे त्यांनी पत्रकार परिषद माहिती दिली. यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदेत उपस्थित होते.





