Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

3 माकडांना केले घरात बंद…. माकड झाले फरार… वनविभाग, नागरिक अचंबित…

वनविभाग उशिरा आल्याने वानरांना पकडण्यात अपयश…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

तालुक्यातील चिखलगाव येथील महादेव नगर मध्ये बुधवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान वानरसेना अचानक आली आणि देवांश डेली निड्स चे मालक संदीप उरकुडे यांच्या घरात घुसले. त्यामुळे संदीप उरकुडे यांनी दार बंद करून त्यांना आत मध्ये बंदिस्त ठेवले. त्यानंतर वन विभागाला फोन करून बोलवण्यात आले होते, मात्र अडीच तास वनविभाग उशिरा आल्याने हे वानरसेना दार उघडून केव्हा पसार झाले याचा थांग पत्ता घरमालक व परिसरातील नागरिकाना लागला नाही, त्यामुळे सर्वजण अचंबित झाले.

महादेव नगरी मध्ये काही दिवसापासून वानरांचा धुमाकूळ सुरू होता. यासंदर्भात महादेव नगरवासी यांनी वनविभागाला तक्रार केली होती व तात्काळ कारवाही करणार असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले होते, मात्र वनविभागाने कोणतीच कारवाई केले नाही. बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान हे वानर यांच्या घरात घुसल्यामुळे संतापलेल्या नागरिकाने त्या वाणराना घरामध्ये बंद केले. त्यानंतर अडीच तासाने वनविभागाची चमू आले व धुमाकूळ घालणारे तिन्ही वानरांनी पलायन केले होते. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळेवर आले असते तर हे तीनही वानर वनविभागाला पकडता आले असते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही वानरसेना पळून गेल्याने वनविभाग हा नावाचेच आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

काही दिवसापूर्वी याच महादेव नगरीत एका महिलेवर याच वाणरांनी हल्ला केला होता असे येथील नागरिक सांगत आहे. ही गंभीर घटना या महादेव नगरीत घडली आहे. मात्र वनविभाग तक्रार देवून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप तेथील नागरिक करीत आहे.

चिखलगाव येथील माजी सरपंच तथा उपसरपंच सुनील कातकडे हे महादेव नगरीचे संचालक असून त्यांचे देखील या नगरी कडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. या वाणरांनी अनेक वेळा या भागात धुमाकूळ घातल्यामुळे तेथील नागरिक, लहान मूल, स्त्रिया भयभीत आहे.

गेल्या महिन्याभरापासून महादेव नगरी मध्ये वानरसेना ने धुमाकूळ घातल्यामुळे वानरांचा बंदोबस्त करावा, या प्राण्यांना मूळे काही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास याला जबाबदार वनविभाग व प्रशासन राहील. असे नागरी म्हणत आहे. वनविभाग वेळेवर न आल्याने व त्यांच्या हलगर्जीपणामुळेच हे वानर वनविभागाच्या जाळ्यात आले नाही हे मात्र खर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular