Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

बाबुलाल यांच्या आयुष्यात आले नवचैतन्य…. सायकल मिळताच चेहऱ्यावर दिसला आनंद… देवासारखे भेटले विजय चोरडिया…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

एखादा व्यक्ती जेव्हा काही करू शकत नाही आणि हतबल होऊन जातो. काय करावे आणि काय नाही असं होऊन जातं. आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा असं प्रत्येकाला वाटतं आणि आयुष्य जगण्याची धडपड सगळ्यांचीच असते. मात्र पैसे आणायची कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतो मग आपल्यासाठी देवाच्या रूपात कोणीतरी येतं आणि मदत करून जातं तेव्हा कोणीतरी आहे याची प्रचिती प्राप्त होते.

सविस्तर वृत्त : वणी शहरातील प्रकाश बाबुलाल भोयर यांना आधीपासूनच पोलिओ या आजाराने ग्रासले होते. त्यानंतर त्यांचा एक्सीडेंट झाला आणि त्यांच्या पायाचे ऑपरेशन सुद्धा करण्यात आले होते. मात्र ते ऑपरेशन यशस्वीरित्या झाले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात निराशा पदरी पडली होती. आर्थिक संकट असल्याने हतबल झाले होते. पण कुठून तरी त्यांच्या आयुष्यात आशेची किरण आशेचे किरण आले आणि देवाने एक मदतीसाठी व्यक्तीला पाठवले आणि त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य घडून आले.

वणी परिसरात प्रख्यात समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि फुल नाही पण फुलाची पाकळी देऊन आपण गरजूंना मदत कशी करता येईल असे सदैव मनात भावना ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते, गरजूंना मदत करणारे, गरिबांचे दाते विजय चोरडिया यांना दिव्यांग प्रकाश बाबुलाल भोयर यांच्याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी लगेचच सायकल भेट दिली. त्यामुळे प्रकाश बाबुलाल भोयर यांना आता आयुष्य जगताना अपंग असल्याची कधीच खंत वाटणार नाही व विजय चोरडिया यांना देवाने त्यांच्या मदतीला पाठवून सायकल दिली, असे मनोगत बाबूलाल ने व्यक्त केले.

सायकल भेट देताना विशाल दुधबळे ,फ़ैजन शेख, उमेश पोद्दार राजू रिंगोले, कानिफनाथ गुरुदेव सेवा मंडळ, गोकुळ नगर चे अध्यक्ष नंदू गधाईकर, सदस्य देवराव आतमंगल, हनुमान गदाईकर ,विठ्ठल मोरे ,मारुती मोरे ,आकाश महाकुलकर,विनोद बगाडे, शंकर घोगरे, विजय मोरे, दीपक मोरे ,नागेश आतमंगल ,विजय गवते ,संजय भिसे ,लाला भिसे ,राजू घोगरे ,बापूराव घोगरे ,नरेश घोगरे ,मंगेश घोगरे व गोकुळ नगरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular