कार्यशाळेत प्रशिक्षण घेणाऱ्यांना गायनाची मिळणार संधी…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहर हे सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. वेगवेग क्षेत्रात नावनुरुप कलावंत आलेले आहे. आपल्या शहरात नेहमीच कोणते ना कोणते दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. वनिता समाज आणि जैताई मंदिर द्वारा आयोजित नि : शुल्क द्वी द्विवशीय संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 30 व 31 जुलै रोजी जैताई मंदिर सभागृहात सकाळी 11 ते 5 पर्यंत ही कार्यशाळा सुरू असणार आहे. या कार्यशाळेत सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, सुर व ताल, मंच प्रदर्शन, गाणे संगीतबद्ध कसे करायचे, कराओके वर गाणी कशा पद्धतीने म्हणायचे या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहेत.

ही संगीत कार्यशाळा घेण्याकरिता नागपूर येथील प्रसिद्ध ईटीवी सारेगामा विजेता व झी टीव्ही सारेगामा फेम निरंजन बोबडे व पुण्याच्या संगीत विशारद, गायिका व अभिनेत्री असलेल्या पूजा टिकेकर हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे वणी परिसरातील संगीत शिकणाऱ्या सर्व तरुण-तरुणी महिला पुरुष यांच्याकरिता सुवर्णसंधी आहे. या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

कार्यशाळेच्या माहितीकरिता तसेच नाव नोंदणी करिता भारती सरपटवार 8788854915, अनुश्री देशपांडे, अंजली भट, अपर्णा देशपांडे, जया सरमोकदम, कांचन बुजोणे, संगीता गुंडावार, प्रिया बिवलकर, राधा वैद्य, तृप्ती उंबरकर, रेणुका शुक्ल, प्रियंका कोटनाके, लता पांडे, कीर्ती कोंडावार, नूतन उपाध्ये, स्वप्ना पावडे, अमृता अलोणे, अर्चना उपाध्ये, कामिनी हुड, लक्ष्मी पाटील, निमा जीवने, संध्या अवताडे, कीर्ती कोंडावार यांच्याशी संपर्क साधावा.





