वृध्द महिलेने यशस्वी होण्याचा दिला आशीर्वाद….. पाटण येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग

AM न्यूज वृत्तांकन, पाटण
दातृत्वाचे धनी लोकांच्या मनातली भावना समजणारे ज्यांनी अनेकांना दृष्टी दिली. जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने सदैव कार्य करणारे विजय चोरडिया यांनी वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये नेत्र निदान शिबिर घेऊन अनेकांचे ऑपरेशन केले. त्यांना मोफत चष्मे दिले आहे. हे सर्व त्यांनी स्वबळावर केलेले आहे. अशा थोर समाज सेवकाला जनतेचा खूप खूप आशीर्वाद लाभतो, तेव्हा आशीर्वादापेक्षा कोणतेच मोठे धन नाही हे सत्य आहे.

झरी तालुक्यातील पाटण येथे दिनांक एक ऑगस्ट 2024 ला बालाजी मंदिर परिसरात मोफत नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पाटण गावातील व परिसरातील साधारणता 850 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. नेत्र शस्त्रक्रियेसाठी 100 रुग्ण पात्र ठरले असून 50 रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे आणि उर्वरित शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसानंतर या रुग्णांना पाठविण्यात येणार आहे. या सर्वांची जाणे येणे राहणे जेवण अशी व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे.

शिबिरातील 400 रुग्णांना मोफत चष्मेवाटप करण्यात येणार असून बाकीच्या रुग्णांनची आरोग्य तपासणी मध्ये रक्तदाब, मधुमेह, श्वसन, ताप, सर्दी , खोकला अशा आजारांवर औषधोपचार करण्यात आला.
शिबिरामध्ये आलेल्या महिलेने विजय बाबू चोरडिया यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. त्या म्हणाल्या विजय बाबू तुम्ही आमच्या परिसरात हे डोळ्याचे शिबिर घेऊन आमच्यासाठी उपकार केले. तुम्ही आमच्यासाठी देवासारखे धावून आले, देवानेच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलं तुम्ही सदैव सुखी राहा व खूप मोठे व्हा आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, असे मत व्यक्त केले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावर स्थानिक पाटणचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मेथेवार, विश्व हिंदू परिषद चे तुळशीराम गेडाम, प्रा. डॉ. दिलीप अलोणे उपस्थित होते. यावेळी एकल अभियान आचार्य महिला समिती, बजरंग दल विश्व हिंदू परिषद स्थानिक परिसरातील नागरिक यांनी विजयबाबू चोरडिया यांचे स्वागत करून या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

पाटण येथे झालेल्या शिबिरामधील रुग्णांनची उत्तम व्यवस्था केल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी विजयबाबू चोरडिया यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि या परिसरातील सर्व नागरिकांचे सहकार्य असणार असे मत नागरिकांनी व्यक्त केले.





