भक्ती गीतांवर आधारित एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

संस्कार भारती समिती व सागर झेप बहुउद्देशीय संस्था द्वारे गुरुपूजन व नटराज पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारती समिती ही कलावंतांना व्यासपीठ त्यांच्या कलेला वाव देण्याचे कार्य करते. त्यामुळे आपल्या शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक कलावंत हा आपल्या गुरु कडून कला शिकून त्याला मोठं करत असतो आणि याचे श्रेय गुरुचे असल्याने गुरुविना मार्ग नाही म्हणून गुरुपूजन करून त्यांना गुरुदक्षिणा देण्याचा कार्य या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे. या कार्यक्रमात नाट्य कलावंत अशोक सोनटक्के व खाती चौकातील मूर्ती कलावंत नामदेव गाताडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या वतीने भक्ती गीतांवर आधारित एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे वयोगट 6 ते 14 व 14 च्या वरील स्पर्धक यामध्ये आपली कला सादर करणार आहे.

दिनांक 28 जुलै 2024 ला सकाळी 11.30 ला श्री विनायक मंगल कार्यालय छोरिया लेआउट गणेशपुर येथे गुरुपूजन, नटराज पूजन व एकल नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमांमध्ये सर्व नाट्य नृत्य संगीत व विविध कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या आवाहन संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा रजनी पोयाम, सचिव सागर मुने व विजय चोरडिया यांनी केले आहे.






