शिकण्याची जिद्द असल्यामुळे अपंगावर मात करून यशस्वी होणार….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

आजच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मात्र, अनेकांना काही ना काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, यावरही काही उपाय केले जातात आणि शिक्षण शिकण्याची जिद्द मनात असली की, पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मिळतात. असाच प्रत्यय वणी शहरात दिसून आला.

शहरातील रहिवासी श्रेया अनिल भोंगळे या विद्यार्थिनी ला कमरेपासून पायाला अपंगत्व आले होते, मात्र मनात शिकण्याची इच्छा असल्याने या अपंग विद्यार्थिनीने भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा समाजसेवी विजय चोरडिया यांच्याशी संपर्क केला. विजय चोरडिया यांनी लगेच वणी अर्बन निधी मार्फत श्रेया भोंगळे हिला शिक्षणासाठी संगणक व इतर साहित्याची भेट दिली. सोबतच भविष्यात शिक्षण संदर्भात कोणतीही मदत लागल्यास आपला मदतीचा हात कायम असल्याचे आश्वासन चोरडिया यांनी दिले. यावेळी भोंगळे कुटुंबीय भारावून गेले आणि त्यांच्या मदतीने सर्वत्र विजय चोरडिया यांचे मनःपूर्वक आभार मानले. श्रेया म्हणाली मला ही खूप मोठी अनमोल भेट आहे. मला संगणक मिळाल्याने खूप आधार मिळाला. माझ्या आयुष्यात मी काही तरी चांगल शिकून आयुष्य उत्तम जगणार आहे.

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो,या भावनेतून समाजहितासाठी आपण सदैव कार्यरत राहणार. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन अध्यक्ष विजय चोरडिया म्हणाले.




