प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरात वाहू लागलेले आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोमात कामाला लागले असून प्रत्येक गावात, शहरात, शहरातील विविध भागात शाखा प्रमुखाची निवड करणे सुरू झाले आहे.

शिवसेनेचे युवा शिवसैनिक साकेत भुजबळराव यांचे पक्षासाठी कार्य उत्साहात व उत्कृष्ट सुरू असल्याने शाखेने कार्याची दखल घेऊन मुंबईचे संपर्क प्रमुख पेंडणेकर यांनी वणी विधानसभा प्रमुख संजय दरेकर यांच्या नेतृत्वात साकेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट टागोर चौक शाखेचे शाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी मुंबई संपर्क प्रमुख पेंडणेकर, संजय देरकर, जिल्हाप्रमुख दीपक कोकास, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, शहर प्रमुख सुधीर थेरे, उपशहर प्रमुख अजय चन्ने, राज्य कार्याध्यक्ष अविनाश भुजबळराव, विभाग प्रमुख चंदू हस्तक, उपशाखाप्रमुख विलास भट, उपविभाग प्रमुख राहुल कोलते, सुजल टिकले आणि समस्त शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





