वणी विधानसभा क्षेत्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार… सर्व पक्ष लागले कामाला…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
2024 विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे त्याकरिता प्रत्येक जण कामाला लागलेला दिसतो आहे मागील पाच वर्षात वनी विधानसभा क्षेत्र समस्या काहीच नव्हत्या मात्र महिनाभरापासून निवेदन देऊन समस्या दाखवण्याचा कार्य सुरू आहे समस्या न सोडवल्यास आंदोलन करणार असे निवेदन त्यांनी सुरू झाले आहे.

प्रत्येक पक्षात गट बाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही उघड तर काही आतमध्ये सुरू आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने उबाठा व शिंदे गटात रस्सी खेच जोरात सुरू झाली आहे, यात तीळ मात्र शंका नाही. निवडणूक आल्यावर संजय देरकर खूप जोमाने कामाला लागतात आणि निवडणूक संपली की शांत होतात हे सुध्दा मतदार राजाला चांगलेच माहीत आहे. विश्वास नांदेकर व संजय देरकर यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने विधानसभा क्षेत्रात जनतेच्या मनात काय आहे हे नंतर कळणारच आहे.

काँगेस चे वामनराव कासावर हे राजकीय खेळीसाठी चतुर असल्याने उमेदवारी स्वतः घेतील की दुसऱ्याला देतील यात खूप मोठा प्रश्न आहे ? काँग्रेस मध्ये उघड पणे गटबाजी आहे. हे वसंत जिनिंग मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले. वणी विधानसभा पिंजून काढणारे, नवीन चेहरा म्हणून उदयास येणारे काँग्रेस चे संजय खाडे यांना उमेदवारी मिळेल का ? मिळाली तर गटबाजी खेळ करणार का ? असे प्रश्न निर्माण झाले आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड, मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट यांनी पण निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी शासनाला आग्रह धरत आहे. एकंदरीत सगळे शांत पक्ष आम्ही जिवंत आहोत व आमची दावेदारी आहे. यासाठी सगळे वेगवेगळ्या माध्यमातून दिसत आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा झेंडा फडकत होता. मात्र 2014 पासून भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आहे. मात्र आणखी नवीन चेहरे येण्याची शक्यता आहे, जे पडद्यामागे वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्कात राहून उमेदवारीसाठी दावेदारी करणार असल्याचा सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पक्षाने संधी द्यावी व मी सुद्धा उमेदवारीसाठी सर्व परीने सक्षम व योग्य उमेदवार असल्याचे असल्याने वरिष्ठांना उमेदवारीसाठी मागणी करणार आहे विजय चोरडिया यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा रस्सीखेच होणार हे मात्र खरं आहे.
सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मतदार राजा आता खूप सुज्ञ झाला आहे. त्यामुळे कितीही प्रलोभन दिले तरी कोण किती कार्य करतो हे मतदारांना चांगलच माहिती आहे. येणारी विधानसभा अतिशय चुरशीची होणार , पक्षाचे गणित कसे असणार आणि आपल्या भागातील सर्व पक्षाचे नेते कोणाची दांडी उडविणार हे येणारी वेळच सांगणार आहे.




