प्रतिनिधी: आकाश दुबे, वणी
शेतकरी बांधवांनो तुम्हाला सरकारद्वारे जारी केलेल्या एका योजनेची माहिती देण्यात येत आहे. अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकता. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कोणताही गरीब शेतकरी 1लाख 60 हजार पर्यंत कर्ज सहज मिळते. खरे तर ही योजना जे शेती करतात आणि काही जनावरे पाळतात अशा पशुपालकांसाठी चालवली आहे.

पशुधन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या एक लाख 60 हजार ते 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. शेतीपासून उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक साईड बिजनेस म्हणून उपयुक्त ठरते.

हे कर्ज केंद्र सरकारकडून कोणत्याही हमी शिवाय दिले जाणार असून हे कर्ज मिळण्यासाठी कोणालाही फारशी कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. अत्यंत सोप्या मार्गाने हे कर्ज कोणाला पण मिळू शकते, अत्यंत कमी व्याज दरात कर्ज मिळेल. या योजनेअंतर्गत पशुधन किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्याला सात टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाईल. त्याची परतफेड सुलभ हप्त्यामध्ये करता येईल, तर केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याजदराचे अनुदान दिले जाईल.

म्हणजेच चार टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज ही अतिशय चांगली बाब आहे. हे कर्ज घेऊन तुम्ही जनावरे देखील खरेदी करू शकता आणि त्यांचे संगोपन करून तुमचे उत्पन्न देखील वाढवू शकता म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या जनावरांसाठी या कर्जाच्या रकमेचा लाभ घेऊ शकता. पशु किसान क्रेडिट कार्ड कर्जाची रक्कम जनावरांसाठी गाईवर कर्ज रुपये 40, 783 , म्हशीवर कर्ज 60,249 … बेड गोट फार्मिंग साठी कर्ज 4063 रुपये, कुक्कुट पालनासाठी 720 रुपये अशा पद्धतीने देण्यात येणार आहे.





