Thursday, July 23, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणी ते शिरपूर कावड यात्रेला जैताई मंदिरातून होणार सुरुवात…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

विदर्भातील प्रसिद्ध जागृत जैताई देवस्थान येथून दिनांक 17 ऑगस्ट ला शनिवारी सकाळी वणी ते शिरपूर कावड यात्रेला सुरुवात होणार आहे. या कावड यात्रेमध्ये परिसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून भगवान शिव शंकराचा नाम जप करत शिरपूर येथे ही कावड यात्रा पोहोचणार आहे.

या कावड यात्रेमध्ये सर्व भक्तांकरिता चार चाकी गाडींची व्यवस्था, चहा नाष्टा, वैद्यकीय सुविधा करण्यात आली आहे. जे भक्तगण पायी चालून थकले किंवा कोणी आजारी झाल्यास त्यांना या बस गाडीमध्ये बसवण्यात येईल तसेच शिरपूर वरून परत वणी येथील जैताई मंदिरात भक्तांना सोडण्यात येईल. सर्व व्यवस्था भक्तांसाठी करण्यात आली असून सर्व सुविधा नि: शुल्क सेवा असणार आहे. श्री काशी शिवमहापुराण समिती, त्रिशूल यात्रा समिती व शिवभक्त परिवार तर्फे या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या कावड यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular