Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

रोटरी क्लब आंतरशालेय नृत्य स्पर्धेत विवेकानंद विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळ प्रथम…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी तर्फे एस.बी. लॉन येथे देशभक्ती गितांवर आधारीत आंतरशालेय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अ वर्ग ०१ ते ०७ अ गटात पहिले बक्षीस रोख ७,७७७ रुपये विवेकानंद प्राथमिक विद्यालय, दुसरे रोख ५,५५५ रुपये मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी, तिसरे रोख ३,३३३ रुपए बालविद्या मंदीर प्राथमिक शाळा यांनी प्राप्त केले. तसेच दुसरा गट वर्ग ०८ ते १० माध्यमिक गटात प्रथम क्रमांक एस.पी.एम शाळा रोख ७,७७७ रुपये, दुसरे संताजी इंग्लिश मीडियम स्कूल रोख ५,५५५ रुपये, तिसरे स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल रोख ३,३३३ रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.


या या स्पर्धेमध्ये वणीतील एकुण वीस शाळांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, वाहतूक विभाग प्रमुख सीता वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते गरिबांचे दाते भाजप प्रदेश सदस्य विजयबाबु चोरडिया उपस्थित होते. नृत्य स्पर्धेचे परिक्षण नागपुर येथील शुभांगी सरोदे, स्वप्निल भरणे व सर्वश्री जुनघरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र-संचालन रोटे डॉ.अभिजित अणे व रोटे शहाबुद्दीन अजानी यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉ. परेश पटेल, सचिव रोटे धवन अग्रवाल, माजी अध्यक्ष रोटे अरुण कावडकर, रोटे निकेत गुप्ता, रोटे निखिल केडीया, रोटे संदीप जैसवाल, रोटे अनिल उतरवार, रोटे अंकुश जैसवाल, रोटे विनोद खुराणा व सदस्य रोटे लवलेश लाल, रोटे अचल जोबनपुत्रा, रोटे असलम चीनी, रोटे राजेश राठी, रोटे शुभम मदान, रोटे मयूर गेडाम, रोटे संजय छाजेड, रोटे गौरव जोबनपुत्रा, रोटे जितेंद्र फेरवानी, रोटे अंकुश भंडारी, रोटे श्रेयस निखार, रोटे हिमांशू बत्रा, रोटे रूद्र ताटेवार, रोटे नवीन जैन, रोटे. प्रकाश कावडे, रोटे मनीष बत्रा, रोटे प्रिया केडिया, रोटे शिल्पी जैसवाल, रोटे आरती उत्तरवार, रोटे शालू गुप्ता व रोटे स्वाती पटेल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular