खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती …
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात वसंत जिनिंगचे अध्यक्ष झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या संकल्पनेतून शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही न्याय यात्रा मारेगाव तालुक्यातून सुरू करण्यात आली होती. मारेगाव तालुका तीन दिवस व झरी तालुक्यात दोन दिवस न्याय यात्रा फिरली येथील शेतकरी शेतमजूर युवकांच्या समस्या संयोजक आशिष खुलसंगे यांनी जाणून घेतल्या मारेगाव झरी तालुक्यात शेतकरी न्याय यात्रेला उदंड प्रतिसाद लाभला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करून 16 ऑगस्टला आराध्य दैवत जगन्नाथ बाबा देवस्थान भांदेवाडा येथून शेतकरी न्यायात्रेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी संत जगन्नाथ महाराजांचे पूजन करून चंद्रपूर वणीआर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संयोजक आशिष कुलसंगे यांनी शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी दाखवली व न्याय यात्रेला सुरुवात करण्यात आली. भर पावसात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. भांडेवाडा येथून राजुर , पळसोनी , मुर्धोनी , मोहुर्लि ,वीरकुंड, बोर्डा , घोंसा दहेगाव येथे शेतकरी न्यायात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेत मोठ्या प्रमाणात महिला पुरुष या सह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ऍड. देविदास काळे तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, डॉ महेंद्र लोढा, राजू कासावार, राजू एलटीवार, जय आबड, महिला शहराध्यक्ष श्यामा तोटावर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





