प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान करणारे रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी AIMIM तर्फे करण्यात आली आहे. दि. 20 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजता मुराद अली शाह दरगाह इतुन घोषणाबाजी करत रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याची निषेध रॅली काढण्यात आली होती. पोलिसात निवेदन देऊन रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातुन केली आहे.

मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात या मध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केल्या जात नाही.

निवेदनात म्हटले आहे कि, रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सद्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाटोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून रामगिरी महाराजांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. अशी मागणी निवेदनातून केली आहे.

निवेदन देते वेळी आसिम हुसैन AIMIM वणी शहर अध्यक्ष, साकिब अहमद खान,तौसिफ खान, शहबाज अहमद सय्यद मुफीज,अजहर शेख,साकीर खान,शाहीद शमशेर खान, इमरान खान, राहत शेख,रेहान शेख,सय्यद मुस्तकीम व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





