Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज वणीत प्रसिद्ध लखबीर सिंग लक्खा यांची भजन संध्या…

शासकीय मैदानात रसिकांची होणार मोठी गर्दी… कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

बेटा बुलाये, मैया का चोला, प्यारा सजा है तेरा द्वार भवानी, किजो केसरी के लाल सारखे अनेक भक्ती गीते गाणारे प्रसिद्ध भजन गायक लखबीर सिंग लक्खा आपल्या वणी शहरातील शासकीय मैदान येथे आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या दमदार आवाजात भजन संध्या कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण आठवडा जन्म कृष्ण उत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यापैकी 22 तारखेला होणारा भजन संध्या कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती उत्सवाचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी दिली आहे.

वणी शहरात आज सकाळी आगमन झाले असून त्यांना घेण्याकरिता जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी वणीच्या रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत केले. वणीतील सर्व रसिकांना आवाहन करण्यात येत आहे की सायंकाळी सहा वाजता सर्व रसिकांनी उपस्थित राहून भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular