AM न्यूज वृत्तांकन, वणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे आज वणी शहरात आगमन झालेले आहे. विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र भर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधत आहे.

नागपूर भंडारा गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर येथील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठका घेऊन वणी शहरात त्यांचे आगमन काल रात्री झालेले आहे. आज सकाळी दिनांक 23 ऑगस्टला शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या बैठकीत वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचा झेंडा फडकविण्यासाठी राजू उंबरकर यांना निवडून देण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून मनसेचा झेंडा फडकविण्यासाठी काय करायला पाहिजे, ही रणनीती आखली जाणार आहे.





