Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

स्व. राजीव गांधी जयंती निमित्त छोट्या व्यवसायिकांना छत्रीचे वाटप…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

आधुनिक भारताचे शिल्पकार टेलिकॉम व संगणक क्रांती देशात आणणारे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने वसंत जिनिंग चे अध्यक्ष व जरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या सौजन्याने शहरातील रस्त्यावर बसून उदरनिर्वाहासाठी फळे, भाजी , कपडा व्यवसायिक मोची या सर्व रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना पाऊस व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले.

या छत्री पासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या छत्रीवाटप कार्यक्रमाला माजी आमदार वामनराव कासावार, ऍड. देविदास काळे, राजू एलटीवार, ओम ठाकूर, घनश्याम पावडे, संध्या बोबडे, विवेक मांडवकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular