Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणी शहरात आज संध्याछाया दोन अंकी नाटकाचा प्रयोग….

जन्माष्टमी उत्सवात चौथ्या दिवशी पारिवारिक नाट्य प्रयोग… नाट्य रसिकांसाठी मेजवानी….

AM न्यूज वृत्तांकन, वणी

जन्माष्टमी उत्सवाचं हे 21 वे वर्ष असून यावर्षी एका पेक्षा एक असे दर्जेदार कार्यक्रम संपूर्ण आठवड्याभर होत आहे. आज दिनांक 24 ऑगस्टला सायंकाळी 7.00 वाजता स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन व श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती वणी द्वारे आयोजित मानिनी बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारे ” संध्या छाया” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग श्री विनायक मंगल कार्यालय येथे सादर होणार आहे.

या नाटकाचे लेखक जयंत दळवी, दिग्दर्शक रमेश लखमापुरे, नेपथ्य स्वप्निल बोहटे, पार्श्वसंगित कबीर लखमापूरे, रंगभूषा लालजी श्रीवास, प्रकाश योजना रमेश लखमापुरे, निर्मिती सहाय्य प्राची व्यवहारे, निर्मिती सूत्रधार अपर्णा लखमापुरे, असून या नाटकातील कलावंत प्रफुल माटेगावकर, डॉ. दीपलक्ष्मी भट, प्रज्वल भोयर, सत्यम निंबुळकर, तन्मय गंधे, वरूनराज नागुलवार, स्वप्निल भोंगाडे, उमा पाठक हे कलावंत नाटक सादर करणार आहे.

वणीतील कला रसिकांसाठी नाटकाची उत्तम मेजवानी असून हे नाटक कौटुंबिक असल्याने संपूर्ण परिवारासह पाहण्यासारखा आहे. त्यामुळे वणीतील सर्व कला रसिकांनी या नाटकाचा प्रयोग अवश्य पहावा, असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular