Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ध्यान केल्याने दैनदिन जीवनात कसा घडतो…

श्रावण सोमवारी होणारे पावन ध्यान..

AM न्यूज वृत्तांकन, वणी


आपल्याला सर्वांना माहीत आहे की ध्यान आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे. जिथे आपण रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये त्रस्त असतो, तेव्हा ध्यान आपल्याला एक शक्ती देते, शांति प्रदान करते. आपल्या विचारांपासून तर शरीरापर्यंत कणाकणात उत्साह निर्माण करते, ध्यान जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर भगवान महादेव ,भगवान बुद्ध, श्रीकृष्ण, महावीर येत असतात. जेव्हा आपण खरोखर ध्यानात येतो तेव्हाच आपल्याला ध्यानाचा खरा अर्थ समजतो, ध्यानाला ध्यान करूनच समजलं जातं.

पूनम कृष्णा पूरवर या ध्यानासाठी मार्गदर्शन करतात. मागील तीन सोमवारपासून त्यांनी वणी येथे समूह ध्यान घेतले आहे. जे पण ध्यानी आहेत किंवा ध्यान शिकण्यासाठी उत्सुक आहेत असे लोक इथे जमले होते. तसे इथे ध्यान नेहमीसाठीच होत असते, काही ध्यान करणारे व्यक्तींनी त्यांचा अभिप्राय व्यक्त करताना म्हणाले वाईट विचार येणं कमी झालं, आजारांकडे लक्ष जात नाही, विशेषता ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे तो सुद्धा कमी झाला, विद्यार्थ्यांचं अभ्यासा कडे लक्षकेंद्रित करणे वाढलं, असा अभिप्राय इथे येणार्यांनी दिला, पुनम पुरवर यांनी त्यांच्या कडे शिकवणी साठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ध्यानाचे महत्त्व समजून सांगतात आणि ध्यान त्यांच्या जीवनात आणतात. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत ध्यानाचा फायदा होतो असे प्रत्येकानी मत व्यक्त केलं आहे.

महिला आणि पुरुषांचे म्हणणं पडलं की ध्यान केल्याने त्यांची चिडचिड ,राग कमी झाला आणि भावनांचा समतोल साधता येणे शक्य झाले. प्रत्येक रविवारी एक तास नि:शुल्क ध्यानाचा वर्ग पूनम पुरवर यांच्या घरी आदर्श शाळेजवळ, घेण्यात येतो. वणीतील सर्व नागरिकांनी समूह ध्यान (ग्रुप मेडिटेशन) करण्यासाठी येण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular