आरोग्य शिबीर… सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जाणे येणे जेवण मोफत व्यवस्था
AM न्यूज वृत्तांकन, वणी
अनेकांना दृष्टी देण्याचे कार्य हाती घेणारे व समाजाचे काहीतरी देणं समजून समाजकार्या हेच आपले कर्म समजणारे भाजपचे प्रदेश सदस्य, धर्मदाते, गरिबांचे अश्रू पुसणारे विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी व इंडीयन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट ब्रांच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने घोन्सा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील घोन्सा येथे मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2024 ला संत गजानन महाराज मंदिर येथे शिबिर होणार आहे. परिसरातील झंमकोला, दरारा, अडकोलो, अडकली, निमणी, सोनेगाव, दहेगाव, बोर्डा व परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या शिबिरामध्ये मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे तसेच ज्यांच्या डोळ्यांचे शस्त्रक्रिया होणार अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार आहे तसेच त्यांना जाण्या येण्याची भोजनाची राहण्याची सर्व व्यवस्था आयोजक करणार आहे. त्यामुळे गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहिती करिता राजू रींगोले 9284881655, अक्षय वैद्य 8408809141, सचिन क्षीरसागर 8308340293 यांच्याशी संपर्क करावा.





