Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

शहरात दहीहंडीचा थरार… सिनेतारका माधुरी येणार… महाराष्ट्रातील गोविंदा पथक येणार…

30 ऑगस्ट ला मनसे दहीहंडी चे आयोजन…

विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी; दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

कृष्ण जन्माष्टमी पासून संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी मध्येही मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. दिनांक ३० ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजन केले आहे. यावेळी विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती असणार आहे.

मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. शासकीय मैदानावर, पाण्याची टाकी येथे ३० ऑगस्ट रोजी दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली आहे.

विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी असून विविध ठिकाणची गोविंद पथके दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. यावर्षी देखील अनेक गोविंदा पथके सहभागी होणार आहेत.

सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजे पर्यंत या दहीहंडीचा थरार नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सर्व वणीकर नागरिकांनी दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी येण्याचे आवाहन उंबरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular