Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

हंसराज अहिर भव्य शोभा यात्रे बद्दल काय म्हणाले… भव्य शोभा यात्रेतील दृश्य पाहून वणीकर झाले दंग….

ऍड. कुणाल चोरडिया यांनी मानले वणीकरांचे आभार…..

पाहण्यासारखे प्रत्येक दृश्य नावीन्य पूर्ण….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

2024 हे जन्माष्टमी सोहळ्याचे 21 वे वर्ष अतिशय जल्लोषात भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. जन्माष्टमी सोहळा धार्मिक व भक्ती मार्गाचा आहे आणि संपूर्ण देशात जन्माष्टमीचा उत्सव अतिशय भक्ती भावाने साजरा करण्यात येतो. सामाजिक आणि धार्मिक असे विजय चोरडिया व त्यांचा परिवार आहे. विजय चोरडिया यांच्यामुळे शहरात उत्कृष्ट धार्मिक कार्य होतात. त्यांची ही भगवंतावर फार मोठी श्रद्धा आहे. भारतीय परंपरा, संस्कृती यांना जिवंत ठेवण्याचे कार्य विजय चोरडिया अतिशय उत्कृष्टपणे करत आहे. सामाजिक कार्यात, शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक तसेच आपल्या मुलाला घेऊन क्रीडा क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट काम करतात.

शहरातून निघालेल्या शोभायात्रेला लोकांनी सहकार्य केले. अनेक लोकांच्या जवळ पैसे असतात मात्र ते कोणत्याच चांगल्या कामात त्याचा उपयोग करत नाही. विजयबाबु धार्मिक, सामाजिक कुठेच खर्च करत नाही, मात्र विजय चोरडिया हे सामाजिक, धार्मिक कार्याच्या माध्यमातून चांगले कर्म करतात. ते आर्थिक सक्षम असून जनतेमध्ये मिळून चांगले कार्य करतात. नागरिक सुद्धा त्यांना चांगले सहकार्य करतात, लोक जुळलेले आहेत. त्यामुळे आज मी त्यांच्या या भव्य अशा देखण्या शोभायात्रेला भेट देण्याकरिता आलो. असे माजी खासदार व इ मा व राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले.

जन्माष्टमी उत्सवाचे हे 21 वे वर्ष असून यावर्षी दोन नाटक एक प्रसिद्ध लखबीर सिंग लखा यांचे भजन संध्या हा कार्यक्रम कवी संमेलन भव्य नृत्य स्पर्धा भक्ती गीतावर नृत्य स्पर्धा महिला उत्सव समितीतर्फे बघा भगवान श्रीकृष्णावर आधारित नाटक व नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिशय आकर्षक देखणी मनात भरणारी आणि कधीही न झालेली अशी भगवान श्रीकृष्णाची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती या शोभा यात्रेत सर्वात प्रथम झेंडा पकडणारे मावळे नंतर घोड्यावर श्रीकृष्ण वेशभूषा धारी, ताशा, वारकरी भजन दिंडी, भगवान कृष्णाची पालखी, गरबा नृत्य, महाकाल झाकी, आदिवासी नृत्य , ढोल ताशा पथक, वाघांचे वस्त्र परिधान केलेले वाघोबा नृत्य, महिला भजन अशा प्रकारे प्रकाशमय दिसणारी सुंदर भव्य शोभा यात्रा पाहून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते.

शोभा यात्रा प्रत्येक चौकात गेल्यावर शिवतांडव , आदिवासी नृत्य, ढोल ताशा पथक, वाघोबा, वारकरी दिंडी विशेष लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक चौकात नागरिक आपल्या मोबाईल मध्ये शोभा यात्रेतील प्रत्येक दृश्य टिपून घेतले. रस्त्याने व घरावरून नागरिक खूप उत्सुकतेने शोभा यात्रा पाहून एकच वाक्य म्हणत होते अशी नयनरम्य देखावा असणारी इतकी मोठी कधीच पहिली नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक व्यक्ती यात्रेतील दृष्य पाहून तृप्त झाला होता.

जय महाकाल झाकी

शहरातील प्रत्येक चौकात यात्रेतील भक्तांसाठी नाश्ता, चहा, पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी शोभा यात्रेला भेट दिली होती. शोभा यात्रेत राधा कृष्ण, दुर्गा देवी, महाकाली राक्षस, लहान लहान मुलांनी कृष्ण राधाचे वेशभूषा केल्या होत्या.

जनमाष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी सर्व भक्तांचे, समितीच्या पदाधिकारी, सदस्य , महिला व सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य केले आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तसेच वणीकरांचे व सर्वांचे विशेष आभार मानले. दरवर्षी याही पेक्षा उत्कृष्ट करू असे मनोगत व्यक्त करताना भावूक झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular