
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा रोड वणी येथे पालक सभा संपन्न झाली . या सभेत 200 पालक उपस्थित होते. या वेळी विद्यालयाचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार , उपाध्यक्ष बलदेव खुंगर , महेंद्रकुमार श्रीवास्तव , कार्यकारी संचालक प्रशांत गोडे , प्राचार्या चित्रा देशपांडे उपस्थित होत्या.

यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी प्रत्येक वर्गात भेट दिली व पालक विद्यार्थी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला ते म्हणाले कि विदयार्थ्यांचा सर्वागीन शैक्षणिक विकास होण्याकरिता वर्ग 6 ते 8 या वर्गास सुधारित अभ्यासक्रम सुरु करण्यात आला व त्याला शिक्षक न्याय देतीलच अशी ग्वाही त्यांनी दिली.

या सुधारित अभ्यासक्रमाचा लाभ विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरीता निश्चितच होईल . तसेच विदयार्थ्यांच्या सुरक्षेतेची 100% हमी दिली. विदयार्थ्यांनी मोबाईल चा वापर करू नये व पालकांनी व पाल्यानी अभ्यासाबाबत जागृत राहण्याची विंनती केली . त्याच प्रमाणे बी. एस. सी. च्या विदयार्थ्यांना नियमित महाविद्यालयात येणे गरजेचे आहे, असे मत प्रतिपादन केले .

विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शुद्ध पाणी व स्वछ परिसराची पाहणी केली . पालकांनी शाळेच्या प्रशासनावर व पदाधिकाऱ्यावर समाधान व्यक्त केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या चित्रा देशपांडे व सर्व शिक्षक वृंद , इतरेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .





