Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणीत अभिनव पद्धतीने संस्कृत सप्ताह संपन्न….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि संस्कृत भारती शाखा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने संस्कृत सप्ताह संपन्न करण्यात आला.
संस्कृत भारती द्वारा प्रकाशित संस्कृतं वदतु ! या पुस्तिकेच्या आधारे महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवडक विद्यार्थिनींनी वणी शहरातील विविध ५० घरांची संपर्क साधून त्यांना या पुस्तकांचे नि: शुल्क वितरण करण्यात आले.


या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तिकेत रोजच्या जीवनात आवश्यक असणारी शेकडो संस्कृत वाक्ये, वेगवेगळ्या पदार्थांना, वस्तूंना असणारी संस्कृत नावे, संस्कृत मध्ये वेळ सांगण्याची पद्धत, विविध व्यवसायात आवश्यक संस्कृत वाक्ये अशा स्वरूपातील माहितीच्या आधारे सात दिवसात एकूण ५० प्रश्नांच्या सात प्रश्न मालिका त्या सर्व घरात वितरित करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात आल्या.


छकुली मांदाडे, प्राजक्ता धांदे, श्रद्धा वानखेडे, दीपाली कांबळे, दुर्गा बनसुले, ज्योत्स्ना शेडामे, साक्षी म्हसे, साक्षी सोनेकर, सम्यक् तामगाडगे, ईशा पारशिवे, तनीषा सहारे, योग्यश्री वाढनकर, प्रतीक्षा जोशी या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख तथा संस्कृत भारती शाखा वणीचे अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या मार्गदर्शनात या अभिनव स्वरूपात संपन्न केलेल्या उपक्रमात विचारलेले सर्व प्रश्न देखील सम्यक् तामगाडगे या विद्यार्थिनीनेच तयार केले होते हे विशेष उल्लेखनीय.


या निमित्ताने आम्हाला संस्कृतमधील अनेक गोष्टी प्रथमच समजल्या. ही खूप कठीण भाषा आहे अशी आमची पूर्वग्रह भूमिका निश्चितच थोडी दूर झाली. संस्कृत भाषेतील अशा अनेक गोष्टी समजून घेण्यास आम्हाला आनंदच वाटेल. अशा स्वरूपात उपक्रमात सहभागी नागरिकांच्या प्रतिक्रियांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
अशा स्वरूपात प्रथमच साकारलेल्या या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विशेष कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular